जीवन का आणि कसे जगले पाहिजे हे समजावून सांगताना स्वाध्याय परिवार

        स्वाध्याय जीवनात सांगित निर्माण करतो. त्यासाठी स्वाध्यायात अतिशय तेजस्वी ग्रंथ असला पाहिजे. म्हणून उपनिषदांचा स्वाध्याय व्हायला हवा. श्रुती नंतर स्मृतीचा स्वाध्याय झाला पाहिजे. गीतेत वैदिक वाङ्मयाचा सारांश आहे आणि त्यातला एकही सिद्धांत वेदविरोधी नाही. म्हणून गीतेचा स्वाध्याय म्हणजे वेदांचा स्वाध्याय असे म्हणण्यास काही हरकत नाही. 
      आपण पुस्तक वाचू, धार्मिक वाचू पण तेच धार्मीक ग्रंथ वाचू की जे आपल्याला उभे करतात, जे आपल्याला जीवन जगण्याची हिंमत देतात, जे आपल्याला पांगळा बनवत नाहीत, लाचार बनवत नाहीत. आपल्यात असणारे दोष ते जरूर दाखवतील पण त्याचबरोबर दोष काढण्याचा रस्ता दाखवून, 'दोष काढण्याचा प्रयत्न स्वतःच करायचा असतो' असे ते समजावतील . दोषांकडे नजरेला नजर देऊन बघण्याची हिम्मत देतील‌. 'प्रभो! मी पापी आहे, मी पापे केली आहेत मला त्यांची शिक्षा दे .असे सांगण्याची हिंम्मत ज्यामुळे मिळते त्याचे नाव स्वाध्याय. वैदीक ग्रंथाचा स्वाध्याय. वैदिक ग्रंथांचा स्वाध्याय झाला पाहिजे. ह्यातली कुठलीही गोष्ट, कुठलाही गुण जीवनात आणायचा असेल तर स्वाध्याय केला पाहिजे असे सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.