स्वाध्यायी जिवन जगणाऱ्या मानवाचे पैलू.

   जीवन एक सांबार आहे. जीवनात आवेश आहे, प्रेम आहे, असक्ती आहे, धिक्कार आणि स्वीकार आहे. अशा गोष्टी मिळवून जीवन बनते. या सगळ्या गोष्टींना स्पर्श करून जीवन योग्य रीतीने समजावणारा ग्रंथ स्वाध्यायात असला पाहिजे‌. केवळ गोष्टी व कथा ऐकून काय होणार? असे विचार मिळायला हवेत की ज्यांनी पुष्टि मिळेल. जे तत्त्वज्ञान जीवन समजावत नसेल ते मला कशाला हवे? जे तत्वज्ञान मला जीवनापासून विमुख करत असेल, मला जीवनापासून पराडमुख करत असेल ते मला पाहिजे कशाला? असे तत्त्वज्ञान जसे भगवंताला मान्य नाही तसे मलाही मान्य नाही. जे तत्त्वज्ञान जीवन समजावते, जीवनातील समस्यांना उत्तर देते जे जीव, जगत आणि जगदीशाचा संबंध समजावते, मानवामानवाचा संबंध समजावते, माझा आणि सृष्टीकर्त्याचा संबंध समजावते, जे त्या संबंधाला उत्तरोत्तर बनवत जाते त्यांचे नाव स्वाध्याय. 

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.