ज्ञानाच्या सात पायऱ्या - 4. शब्द ऐकण्याची भूक

           

            जसे, ऋषींचा उन्नत, उत्तेजक शब्द ऐकायचा, भगवंताचा शब्द ऐकायचा, हे कर्णेर्द्रिंयाच्या क्रियेला उन्नत करणे आहे, तसेच वेगवेगळ्या इंद्रियांचे वेगवेगळ्या क्रिया उन्नत केल्या पाहिजेत. या सर्व गोष्टी भगवंताने आत ठेवले आहेत . त्यालाच म्हणतात भौतिक जीवन समृद्ध करण्याची अभिलाषा. भौतिक जीवन समृद्ध करण्याची अभिलाषा सगळ्यांना आहे.
          जर तुम्ही ऐकण्याचे उन्नतीकरण केलेले असेल तर तुम्ही अध्यात्मिक बनला असे समजले जाईल. हि नीती नाही, हा कायदा नाही, हे धर्मशास्त्र नाही, अभिलाषा नाही पण जिवंत राहिचे असेल तर त्याची नितांत आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. 
           भगवंताचा शब्द ऐकण्याची भूक लागली पाहिजे. चित्तएकाग्रता वाढली तरी देखील भक्त संतुष्ट नसतो. कारण त्याला भगवंताच्या मुखर्विंदातून ऐकायचे आहे की तू चांगला आहेस माझा आहेस आणि मी तुझा आहे. भक्ती शास्त्रात अशा श्रवणाला  किंमत आहे.

Comments