ज्ञानाच्या सात पायऱ्या 3. तहान लागली पाहिजे

               

         

        काही लोक असे मानतात की, 'आम्हाला भौतिक जीवन जगायचं आहे. आपल्या  गोडाऊनमध्ये भगवंतांने काय काय भरले आहे ते सर्व आम्हाला माहीत नाही. आजपर्यंत आम्ही त्याच्या बाबतीत काहीच विचार केला नाही, किती वर्षे आम्ही जेवत आहोत, अन्न खात आहोत, रक्त बनतेच आहे, शरीरात फिरत राहिलेले आहे. आपले काय बिघडले? त्यांना सांगावे लागेल की, तुमचे खूप काही बिघडले आहे, पण तुम्हाला माहित नाही की काय बिघडले आहे. काही विचार केलेला नाही त्यामुळे बिघडले आहे. 

         हे लोक म्हणतात, ऋषींचे शब्द ऐकण्याची आम्हाला तहान नाही. कधी वेळ असेल तर भागवत किंवा गीता ऐकायला जात असतो. काही खराब काम करण्यापेक्षा कथा-कीर्तनाला जाऊन बसणे चांगले. भागवत ऐकणे हा आता व्यवहार झाला आहे  जावयाच्या घरी भागवत कथा ठेवली आहे म्हणजे जायलाच पाहिजे, नाही गेलो तर मुलीच्या सासरकडच्यांना वाईट वाटेल. त्यांना जायची इच्छा नाही पण जावेच लागते म्हणून जातात. म्हणजे सद्विचारांची तहान लागली पाहिजे, ती नाही. हा तहान शब्द खास ध्यान ठेवण्यासारखा आहे. आपल्याला मधुर शब्द ऐकण्याची तहान लागते, त्याच्याशिवाय जीवन अयशस्वी वाटते, जीवनात काही कमी आहे असे वाटते. विडी पिणाऱ्याला विडी चे व्यसन असते. जर त्याला विडी प्यायला मिळाली नाही तर तो अस्वस्थ होतो.

          ऐकल्याशिवाय चालणार नाही त्याला तहान म्हणतात. अशा तहानेने गायन ऐकायला जातात. व्यसनी माणसाला शरम नसते. सिगारेट पिण्याची तलप आली की सर्व सोडून सिगारेट पितो. समोर जेष्ठ असतील तर त्यांना पण सिगारेट ऑफर करतो. काका तुम्ही घ्या परंतु मला सिगारेट पिऊद्या. मी सिगारेट शिवाय राहू शकत नाही. तर मग आध्यात्मिक ज्ञानाची तहान लागली पाहिजे.

        काय बाबा तू रविवारी पाठशाळेत दिसला नाहीस? काका आले होते म्हणून आलो नाही. अरे, काकांना सांगायचं होते की, काका ! तुम्ही पण चला पाठशाळेत. अशा तहानेने आपण पाठशाळेत स्वाध्याय करता येत नाही. वेळ आहे म्हणून येतो. ऋषींचे उत्तेजक शब्द ऐकण्याचे तहान लागली पाहिजे. व्यसन लागले पाहिजे. आपल्या जुन्या लोकांनी त्यासाठी खास व्यसन शब्द वापरला आहे.

          विद्येचे व्यसन लागले पाहिजे. व्यसन शब्दाचा अर्थ हा की त्याच्याशिवाय चालत नाही. शेवटी भगवंताचा शब्द ऐकण्याची तहान लागते. अंतर्मुख झाल्याशिवाय या गोष्टीची समज येत नाही.

          जेव्हा चित्त एकाग्रता वाढते तेव्हा तहान लागते. ती एक वेगळी ताहन आहे. भगवंताच्या मुखरविंदातून तू माझा आहेस हे शब्द ऐकण्याची तहान लागते. ऐकणे उत्तरोत्तर उन्नत केले पाहिजे. वास्तविक, ऐकणे भौतिक सुख आह. भौतिक सुखाची भुक ठेवली आहे. मने त्यासाठी इंद्रियांची ओढ ठेवली आहे. ऐकणे जेव्हा उन्नत बनवू तेव्हा आपण आध्यात्मिक बनू .आपल्याला ऐकायची तहान लागली पाहिजे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन