महाशिवरात्र 2024 - हिंदू संस्कृतीतील महाशिवरात्र सणाचे महत्त्व


        महाशिवरात्र हा हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे. जो भगवान शिवाची पूजा करतो. महाशिवरात्र हा उत्सव वर्षातून एकदा येतो आणि भारतातील लाखो लोक या सणाचा आनंद घेतात.लोक उपवास करतात शिव ची आराधना करतात आणि दिवस रात्र जागृत असतात.
       दरवर्षी महाशिवरात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांच्या दरम्यान येते. असे मानले जाते की या दिवशी भगवान शिव तांडव नावाचे नृत्य करत असतात. जगातील अज्ञान आणि अहंकार दूर करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
      अध्यात्मिक प्रवृत्तीचे लोक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात आणि विश्वास ठेवतात हाच तो दिवस आहे ज्या दिवशी आपण आध्यात्मिक शिखरे गाठू शकतो. यावर्षी महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त 8 मार्च 2024 रोजी साजरा केला जाणार आहे.

Comments