ज्ञानाच्या सात पायऱ्या - 2. विचारणा

                                                               
Just a candle can't burn without fire,
man can't live without a Spiritual life.



 2. विचारणा
              त्यानंतर मी मूर्ख आहे, कारण की मी रोगी आहे. मी जर रोगी आहे तर निरोगी माणसाजवळ मला जायला हवे. मी रडका असेल तर हसणाऱ्या माणसाकडे जायला हवे. मी भयभीत आहे तर मला तो निर्भय आहे त्याच्याकडे जायला हवे .मी अ भक्त आहे तर जो भक्त आहे त्याच्याजवळ जायला हवे. त्याच्याजवळ तद्विध्दि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया| अशा नम्रभवाने आणि आत्मीयतेने जायला हवे, असे गीताकार म्हणतात. आपल्याला जीवन बदलायचा आहे, आपल्या जीवनात गुण संक्रात करायचे आहे, ज्यांच्याकडे गुण संक्रात करायचे आहेत त्यांच्यासमोर अत्यंत नम्र व्हायचे आहे. हिला विचारण्याची पायरी म्हणतात. ही ज्ञानाची दुसरी पायरी आहे . कितीतरी चरित्र भारतीय संस्कृतीच शिकवू शकते. जो यमाच्या दरबारात ताठ मानेने जातो. बाकी सर्वजण खाली मान घालून घाबरत जातात. मराठीत म्हण आहे दार किल कीले स्वर्गाचे, सताड उघडे नरकाचे! स्वर्गाच्या दार अगदी लहान आहे. नारकाचेदार खूप मोठे आहे आणि सतत उघड राहते. कारण करोडोनी लोक नरकात जातात. स्वर्गात जाणारे लोक खूपच कमी. नाचकेता सरळ यमाकडे गेला आणि त्याचे धार खडखडावले. अख्ये जग घाबरते. पण नचिकेत्याला दारावर पाहून यमाची पत्नी पण घाबरून गेली असेल. यमराज तीन दिवसांनी येथील असे सांगून ती दार बंद करते. तीन दिवसानंतर यमराज येतो आणि म्हणतो , नचिकेता तू माझ्या दारी तीन दिवस न खाता पिता राहिलास, त्याचे मला पाप लागेल. जो निर्भयतेने यमाच्या दरवाजावर आला असेल, तेजस्वी असेल, त्याला या जगात काय पाहिजे? यमराज हे जाणत होते म्हणून त्यांनी म्हटले, तुला काही कमी आहे, म्हणून मी तुला तीन वर देत नाही, माझे कल्याण व्हावे म्हणून मी तुला तीन वर मागायला सांगतो. त्यावेळी नचिकेत्याने मागितले की तू मला असे ज्ञान दे की ज्यामुळे मी तुझ्या ताब्यात कधी येणार नाही. ज्याच्या ताब्यात सर्व जगाला जावे लागते त्यालाच हिमतीने सांगायचे की तुझ्या ताब्यात येणार नाही, असे ज्ञान दे! यमराज म्हणतो, तू हे काय मागतो आहेस? त्यापेक्षा सोने माग, द्रव्य माग, तुला जे हवे ते मागून घे. तुला हवे तर अप्सरा मागून घे. ते द्यायला मी तयार आहे.
       नचिकेत म्हणतो, 'मी जे मागतोय, ते तुला द्यायचे नसेल तर नको देऊस. ही सर्व संपत्ती, अप्सरा, हत्ती, घोडे, रथ सर्व तुझ्याजवळच ठेव. तू जर मला ज्ञान दिले नाहीस, तर मी अवघ्या दुनियेत सांगत फिरेन की, यमराजाने मला वचन दिले होते, पण त्याने स्वतःचे वचन पाळले नाही. यमराजासारखी महान शक्ती पण मी सांगितले ते देऊ शकली नाही. नचिकेत निर्भय होता. मेल्यानंतर माझे काय होईल असा विचार करत रडणारा नव्हता. अशाचें वर्णन करण्यात आले आहे.
          भक्त निर्भय असतो. भगवंताला चिकटलेला असतो. तो घाबरेल कशाला? ही विचारणेची भूमिका आहे.
        ही ज्ञानाची सुरुवात आहे. 'मी मूर्ख आहे हे' ही समज आली की ज्ञानाचा प्रारंभ झाला असे समजा. येतपर्यंत माणूस आला की पुढे उन्नत होतो. त्यानंतरची पायरी आहे . तनुमानसा त्यानंतर माणूस सत्वापती, असंसक्ती, पदार्थाभावींनी तुर्यगा अशी ज्ञानाची एक एक पायरी चढत जातो. अशा महापुरुषाकडून जे ज्ञान मिळते, त्या ज्ञानाला गीता पवित्र म्हणते. हे ज्ञान जीवनाला घडवते, जीवनाला बदलवते, त्या ज्ञानाने जीवन दिव्य त्याच्या दिशेने पुढे जाते, त्यामुळे माणूस दिव्या बनतो, तो दिव्य भगवंताला आवडायला लागतो, 'त्याचा' होऊन जातो. शेवटी तो दिव्यत मिसळून जातो. या ज्ञानापेक्षा दुसऱ्या जगात पवित्र काय असू शकते? हेच खरे ज्ञान आहे.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन