ज्ञानाच्या सात पायऱ्या 1. शुभेच्छाखा

ज्ञानाच्या सात पायऱ्या दाखवल्या आहेत. 
शुभेच्छाखा , विचारणा, तनुमानसा, सत्वपती असंसक्ति, पदार्थाभाविनि आणि तुर्यगा . 
एक एक पायरी श्रेष्ठ तर आहे. 

 1. शुभेच्छाखा
 ज्ञानाच्या सुरुवातीची ही पहिली पायरी आहे. 'शुभेच्छाखा म्हणजे जीवनात कुठली गोष्ट शुभ आहे'? 'मी मूर्ख आहे' ही समज आली, ही शुभ गोष्ट आहे. मी शहाणा आहे, मी ज्ञानी आहे' ही शुभ गोष्ट नाही. असे ज्ञानाचे 'शुभ' विचित्र आहे. ज्या क्षणी तुम्हाला हे ज्ञान झाले, की 'मी मूर्ख आहे' तो क्षण 'शुभ क्षण' म्हणावा .जीवनाचे सिद्धांत माहीत व्हायला हवेत. जीवनाच्या सिद्धांताचे चर्वितचर्वण व्हायला पाहिजे .काही सिद्धांतावर आधारलेले जीवन असले पाहिजे त्या सिद्धांतासाठी जीवन असले पाहिजे. जीवन सिद्धांतावर आधारलेले असले पाहिजे. जीवनाचे सिद्धांतच माहीत नाहीत. त्याबद्दल अस्वस्थता वाटली पाहिजे. आपण गीता हातात घेतो, ती अशा अस्वस्थतेमुळेच घेतो. त्याच अवस्थेतेमुळे आपली सर्व इंद्रिय एकाग्र होत नाहीत.
       एकाग्रता म्हणजे तल्लीनता, तन्मयता, मन, बुद्धी,पंचज्ञानेन्द्रियें, पंचकर्मेंद्रिंये हे सर्व एकाग्र व्हायला हवीत. आत एवढी भूक लागायला हवी की, मी मूर्ख आहे, जीवनाचे सिद्धांत मला माहित नाहीत, जीवनाच्या सिद्धांताचे मी चिंतन केले पाहिजे. काही लोकांना असे वाटते की ते पुष्कळ काही जाणतात. मग म्हणतात, मला जेवढे माहित आहे त्याचे चिंतन मनन करतो. खूप चांगली गोष्ट आहे. तुला समजायला लागले हीच तुझ्या मूर्खपणाची परिसिमा आहे. अशी शहाणी माणसे जगात पुष्कळ आहेत. आणि म्हणून जग शूद्रतेने भरलेले आहे. घराघरात प्रत्येक माणूस शहाणा झाला आहे. प्रत्येकाला असे समजायला लागले आहे अशी स्थिती आली आहे. खरोखर! जी सर्व यंत्रणा आहे, त्याच्यामागे कोण आहे? कशासाठी आहे? माझ्याजवळ वैभव आले, मी करोडपतीच्या घरात जन्मलो, जीवनात मला बुद्धी मिळाली आहे, मला सुंदर शरीर मिळाले, हे सर्व माझ्यापाशीच का आले? दुसऱ्याला नाही, त्याचे कारण काय? याच्यामागे काही सिद्धांत आहे. काही निश्चित गोष्ट आहे, की अपघात, आकस्मिकता आहे? जीवनात काही सिद्धांत असले, तर त्याच्यावर जिवन चालायला हवे. प्रथम, मी मूर्ख आहे अशी तीव्र भावना झाली पाहिजे. इथूनच ज्ञानाला सुरवात होते. भगवान गोपालकृष्णाने दिलेल्या गीतेत त्याने दिलेले ज्ञान आहे. ते ज्ञान गीतेकडून मिळवून माझ्या जीवनात चिंतन मनन करीन. मला गीतेतील जीवन विषयक सिद्धांताचे चर्वितचर्वण करायचे आहे, ही शुभेच्छाखा आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन