दैविकार्यनिष्ठा - जिवन जगण्याची कला म्हणजे निस्वार्थ काम




भीती किंवा फळा शिवाय काम करणे हे प्रमुख कार्य आहे. स्वतः भगवंताचे काम करतात व दुसऱ्याकडून विकासात्मक काम करतात ते दैविकार्य आहे. माझ्या ईशाभिलाषेला शास्त्र छेदू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही. पाणी भिजू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही अशी आहे. माझी ईशाभिलाषा रक्ताने स्नान करते पण डोळ्यात अश्रू येत नाही. ती शास्त्राने विद्द होते पण अंतकरणात भय नाही. जीवनात पराभव पदरी येतो पण वृत्ती पराजित नाही. जीवनाने प्रज्वलित झालेली व मृत्यूमुळे अमर बनलेली अशी माझी ईशाभिलाषा संक्रमणात सामर्थ्य व तेजोमयता देते. सोन्याच्या सिंहासनाचे चूर्ण करणारी, सम्राटाच्या वैभवाला तुच्छ लेखणारी, गुलामाला मानव बनवणारी, दासाला स्वामी बनवणारी आणि जोडणारी अशी माझी ईशाभिलाषा आहे. 
भक्तीने केवळ मार्जन करून नाही चालणार. तिच्यात सुर मारला पाहिजे. ही शुराची, वीराची भक्ती आहे. दिनदुबळ्याचे येथे काम नाही.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन