मकर संक्रात
सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस. संक्रातीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रात म्हणतात.
सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो. तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो. म्हणून त्या काळाला उत्तरायणही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. पुन्हा मकर राशीत प्रवेश करण्यास 365 दिवस 6 तास 9 मिनिट 10 सेकंद लागतो. 400 वर्षांनी 3 दिवस संक्रात पुढे जाते. दर वर्षी 9 मिनिट 10 सेकंद कालावधी शिल्लक राहतो. 157 वर्षांनी मकर संक्रात एक दिवस पुढे जाते. 525969 एक वर्षाचे मिनिट.
मकर राशीत प्रवेश करणारा लागणारा कालावधी मिनिटात,
सन 200 मध्ये 22 डिसेंबर
1899 मध्ये 13 जानेवारी
1972 मध्ये 14 जानेवारी
1975 ते 2085 मध्ये 14 जानेवारी तर कधी 15 जानेवारी
2085 ते 2100 मध्ये 15 जानेवारी
2100 नंतर 16 जानेवारी
3246 नंतर एक फेब्रुवारीला संक्रात येईल.
तमसो मा ज्योतिर्गमय - अंधकारातून प्रकाशाकडे प्रयाण करण्याची वैदिक ऋषींची प्रार्थना. कर्मयोगी सूर्य स्वतःच्या क्षणिक प्रमादाला झटकून अंधकारावर आक्रमण करण्याचा त्यादिवशी दृढ संकल्प करतो. त्या दिवसापासून अंधार हळूहळू कमी कमी होत जातो. चांगले कामे करायला या शुभ दिवसाने सुरुवात होते. धार्मिक हिंदू मकर - संक्राती नंतर स्वतःला मृत्यू यावा असा जप करीत असतात. कृतातं यम राजाला उत्तरायणापर्यंत थांबून धरणारे भीष्मपितामह यासंबंधीचे ज्वलंत उदाहरण आहे.

Comments
Post a Comment