भक्ती धारा

 

भक्ती धारा 


विपत्तीमध्ये तू माझे रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही तर विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. 

माझ्या दुःखी व्यथेत मनाच तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही तर दुःखावर मला विजय मिळवता यावा हीच माझी इच्छा. 

माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही तर माझं पण मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा. 

माझी फसवणूक झाली म्हणुन तू मला सावराव अशी माझी अपेक्षा नाही तर माझं मन खंबीर राहावं हीच माझी इच्छा.

 सुखाच्या दिवसात नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढेनच, मात्र दुःखाच्या रात्री जग जेव्हा माझी फसवणूक करेल, तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये हीच माझी इच्छा.

Comments

Popular posts from this blog

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.