मानवी जीवनाच्या अवस्था
स्वतःचे जीवन बदलणे ही माणसाच्या स्वतःच्या हातची गोष्ट आहे. त्यासाठी खालील गोष्टी समजून घेणे गरजेचे आहे.
मानवी जीवनाच्या तीन अवस्था -
1. कौमार्य- विकासासाठी प्रयत्न करणे.
2. यौवन- तारुण्यात आवेश उत्साह असला पाहिजे.
3. जरा- म्हातारपणात शांती पाहिजे.
त्रिदल -
1.प्रेम
2.भाव
3.ज्ञान, ज्याच्या जीवनात प्रेमचक्षु, भावचक्षु व ज्ञानचक्षु असतात. त्याच्या जीवनात त्रिदल असते.
तीन अवस्था -
1. जागृती 2. स्वप्न 3. सुषुप्ती.
सत्कार्यार्थ जागृत असले पाहिजे. विकासासाठी जागृत आहोत का? ईश्वर कार्यासाठी जागृत आहोत का?
स्वप्न सतकार्यासाठी, विकासासाठी स्वप्न पडली पाहिजे.
सुषुप्ती माणसाने काम करण्यासाठी जागृत असावे व फळासाठी झोपलेले असले पाहिजे.
पंचदल
1. विवेकी जीवन - या सृष्टी मध्ये वासना व वासुदेव अशी दोन तत्वे काम करतात. म्हणून वासनेच्या हातात राहणार की वासुदेवाच्या हा निर्णय पक्का होतो त्याला विवेकी जीवन म्हणतात.
2. कृतार्थ जीवन - भगवान मला जे काही करायचे होते ते मी केले आहे. माझ्यासाठी आता काही करायचे बाकी उरलेले नाही. तू मला उचलून घ्यायचे आहे. माझ्या समोध्दाराची वेळ आलेली आहे. माझे कोणतेच काम बाकी राहिलेले नाही. जे राहिले आहे ते तुझे काम आहे हे कृतार्थ जीवन
3. पुष्ट जीवन - मनुष्यत्व कृतज्ञते सोबत भाव पाहिजे. भगवंताविषयी आकर्षण निर्माण व्हावे. महापुरुष संश्रय.
4. सुंदर जीवन - हे भगवंताला आवडते, सुंदर वाटते ते जीवन.
5. प्रसन्न जीवन - महापुरुषाला काही घ्यायचे नसते, करायचे नसते भोगायचे नसते. तो आत्मस्थितीतच मस्त राहतो. त्या जीवनाला प्रसन्न जीवन म्हणतात.

Comments
Post a Comment