स्व-चिंतन
![]() |
| Meditate and you"ll be able to make silence |
खरे मंदिर ते की ज्यात वैदिकांची मूर्ती पूजा, मशिदीची शांती व चर्चची भव्यता एकत्र दिसते. श्रेष्ठ असा आत्मनिष्ठ आनंद प्राप्त करायला योग्य बनते. चित्त एकाग्र करण्यासाठी मूर्तिपूजा आहे. चित्ताची एकाग्रता जीवनाला अखंड शक्ती प्रदान करते. मानवाने चित्त शुद्ध करून भौतिक , सांस्कृतिक व आध्यात्मिक विकास साधावा. पर लोकात श्रेय प्राप्त करावे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गतानुगतीक चाललेली मूर्ती पूजा का उपयोगी पडत नाही. कारण त्यात चित्त शुद्ध होत नाही. विकार जात नाही. कर्माचा हेतू शुद्ध करण्यासाठी मन शुद्ध पाहिजे. त्यासाठी चित्र एकाग्रतेची गरज आहे.
नीतिशास्त्र मिळालेल्या जन्माचा योग्य रीतीने वापर केला नाही तर काय दोष येतील त्याचा विचार कर.
मनुष्य जन्म मिळाला मग मी मनाचा विकास केला का?
धर्म क्रियाशील आहे म्हणून मी काय केले?
गेल्या जन्मात मला ज्या शक्ती मिळाल्या होत्या त्यांचा मी योग्य उपयोग केला नाही.
भगवंत विचारतो माझा भाग काढलास का?
माझे काम केलेस का?
ज्या हेतूसाठी शक्ती दिली आहे ते काम करण्यासाठी दिलेले शक्ती वापरलीस का? तू आज माझ्या दर्शनास आला होतास म्हणून मी तुझ्यावर खुश होईल तू मला भोळाभाबडा समजतोस काय?
स्वतःची वृत्ती बदललीस का?
कधी चित्त शुद्ध करण्याचा प्रयत्न केलास? जीवन विकास करण्यासाठी काही सत्कार्य केलेस?
एखाद्या चांगल्या कार्यास पाठिंबा दिलास? चांगले काम करणाऱ्या एखाद्या माणसाला उत्साहित केले?
चांगले नशीब आले कोठून?
जन्माचा विचार कर, तुझ्यापाशी दान, वैभव, विद्वत्ता वगैरे आली ती कशी आली? स्वतःकडेच कसे आले त्याचा विचार करत नाही त्याला का गेले हे विचारण्याचा अधिकार नाही.

Very nice 👍
ReplyDelete