मनाचे शुद्धी करा
मूर्तीपूजेने, एकाग्रतेनेच मन आणि बुद्धी समर्थ होते. त्यासाठी मूर्ती पूजा हाच मार्ग आहे.
मूर्ती पूजा शास्त्रीय दृष्टीने व्हायला हवी. फर्निचर वर धूळ बसली असेल तर कोणी फर्निचर फेकून देत नाही. त्यावरील धूळ साफ करतो. त्याचप्रमाणे मूर्तीपूजेवर काही कचरा जमला असेल, काही गंज चढला असेल तर तो साफ केला पाहिजे. त्यासाठी कोणी प्रयत्न करत नाही.
बुद्धीशाली लोकांचे हे काम आहे पण ते काम करत नाहीत आणि मूर्ती पूजा करणारे लोक विचार केल्याशिवाय असमंजसपणे मूर्ती पूजा करत असतात. बुद्धिमान लोकांनी त्यांना मूर्ख समजून मूर्तिपूजा सोडून दिली आहे. अशा प्रकारे मूर्ती पूजा करणारे लोक जेवढे मूर्ख आहेत त्याहून जास्त मूर्ख मूर्ती पूजा सोडणारे लोक आहेत. दहा दहा हजार वर्षापासून चालत आलेल्या मूर्ती पूजेबद्दल विचार करायलाही ज्यांना वेळ नाही ते लोक सर्वाधिक मूर्ख आहेत.
चित्त एकाग्र करण्यासाठी भगवंताची मूर्ती समोर पाहिजे. चित्त ज्यात एकाग्र होते त्यासारखेच ते बनते. म्हणून सर्वगुणसंपन्न, सर्वशक्तिमान कारुण्यपूर्ण भगवंतामध्ये एकाग्र व्हायचे. जे जे गुण चांगले वाटतात तेथे सगळे गुण त्याच्यात ठेवायचे म्हणजे ते गुण मनात संक्रांत होतात. Our mind is receptive आवर माईंड इज रिस्पेक्टिव्ह आपले मान ग्रहण शील आहे म्हणून ते गुण स्वीकारते भगवंताचे रूप भगवंताचे रूप मनुष्य असले पाहिजे. कित्येक लोक म्हणतात की मनुष्य भगवंताचे मनुष्य रूपातच कल्पना करेल आणि गाढव गाढवाच्या रूपात कल्पना करेल गाढवाने गाढवाच्या रूपात भगवंताची कल्पना केली तर त्यात काय चुकीचे आहे? गाढव काही तुच्छ नाही, तिरस्कारणीय पण नाही. कित्येक लोक असे काही तरी निरंकूश बोलत असतात.
आम्हाला मनुष्याकार भगवान पाहिजे. कशासाठी? मनुष्यकार भगवंतापाशी आम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकतो आणि भावविभोर होऊ शकतो. आम्ही भावविभोर होतो तेव्हाच आमचे चित्त दृत होते आणि त्यावर भगवंताचा शिक्का उमटतो. दृतेचित्ते प्रविष्टाया गोविंदाकारता स्थिरा. चित्तावर संस्काररुपी शिक्का उमटवण्यासाठी चित्त नरम झाले पाहिजे. आपण कृतज्ञता दाखवावी आणि त्याच्या डोळ्यात वात्सल्य दिसावे. यासाठी भगवंत मनुष्यकारच असला पाहिजे.
Comments
Post a Comment