भगवंताने मनाला दिलेल्या प्रेरणा - प्रेप्सा

   प्रेप्सा -  
          म्हणजे भौतिक वस्तूंची इच्छा किंवा भौतिक वस्तूवर प्रभुत्व प्राप्तूं इच्छा प्रेप्सा. उचलण्याची एक सह सहज प्रेरणा आहे. काही सांभाळायचं आहे अशा वृत्तीमुळे माणूस भांडवलवादी बनला आहे. जर वस्तू दुसर्याकडे असेल तर त्यात आनंद नाही. जी कोणाकडे नाही ते आपल्याकडे आहे त्याचा आनंद आहे. हा एक विकार प्रेप्सेमध्ये घुसला आहे.
       ज्याला मूर्तिपूजा करायचे आहे त्याने या सहजपणे प्रेरणेला वळण दिले पाहिजे. आपण प्रेप्सेचा स्वीकार करतो. भौतिक सुखा कर्ता तिचा स्वीकार करतो. आपल्याला मुक्ती कशासाठी हवे जगाला कंटाळलो आहोत म्हणून आपल्याला मुक्ती हवी आहे. त्याच्या मागे काही बुद्धीपूर्वक तर्क नाही. त्यामागे कोणती बौद्धिक विचारधारा नाही. 
      कंटाळलेले मन जगापासून मुक्ती मागते आहे. कारण जगामध्ये जे सुख मिळाले नाही ते मुक्ती मध्ये मिळेल असे माणसाला वाटते म्हणून तो मुक्ती मागतो. प्रेप्सेची ही बैठक बदलावी लागेल. वास्तविक आपल्याला भक्तीची प्रेप्सा हवी. भौतिक वैभवचा स्वीकार करायचा पण सुखार्थ स्वीकार की भगवत कार्यार्थ स्वीकार.? आपल्याला भौतिक कीर्ती, मोठेपणा, पैसा हे सगळे हवे. 
    आपण महाकाली महा सरस्वती आणि महालक्ष्मी चे पूजन करूनच भगवंताकडे जायचं आहे. आपण भौतिक वैभवला तुच्छ मानलेले नाही पण ती महाकाली महासरस्वती व महालक्ष्मी झाली पाहिजे. प्रश्न इतकाच आहे की भौतिक वैभव सुखकर्ता हवे की भगवत कार्यार्थ आहे. प्रेप्सा राहणारच तिला वळण दिले पाहिजे. जो प्रेप्सेला असे वळण देतो त्याला अध्यात्मिक म्हणतात.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन