ज्ञानाच्या सात भूमिका
1. शुभेच्छाखा- तुझे भले आणि माझे भले म्हणजेच आपले भले. मी अज्ञानी आहे असे मला वाटते तेव्हा शुभ सुरू होते. मी ज्याला शुभ समजतो ते शुभ नाही याची खात्री झाली पाहिजे. भगवंता तुला जे योग्य वाटते तेच कर अशी भावना झाली पाहिजे.
2. विचारना- मला समजले नाही मला समजून घ्यायचे आहे. समजावण्याची पात्रता असलेला माणूस समजलेला असेल तर त्याला ओळखायचे आहे. जो आचार्याचा झाला, ऋषींचा झाला असा समजलेला माणूस आपल्याला कसा भेटेल.? त्याची परीक्षा देखील आपण कसे करू शकू.? पहिली गोष्ट समोरच्यावर विश्वास. आणि दुसरी समोरचा सांगेल ते स्वीकारण्याची तयारी.
3. तनुमानसा- (सद्गुरु) त्याच्या पाठी ऋषींचा अधिकार आहे. ज्याने जीवनात भोगात देखील भाव पाहिला. ज्याच्या जवळ गेल्यानंतर जन्म मरणाचे भव नाहीसे होतात. तो ज्ञानाची मूर्ती आहे. तो सुखदुःखात समान राहतो. सर्व ठिकाणी राहून निर्दोष राहतो. ज्याचे लक्ष तत्त्वमसी आहे. कोणत्याही अवस्थेत असलो तरी तो माझा तिरस्कार करत नाही. तो शुद्ध व अचल असतो. भावाहुन आतीत असतो. तो त्रिगुणाच्या पलीकडे असतो. अशा तनुमाणसा सद्गुरूला मी नमन करतो. त्यामुळे माणसाचे मन तनु होते. तेजस्वी होते, स्वच्छ होते, चित्त एकाग्रता ही ज्ञानाची भूमिका आहे. चित्त एकाग्रतेसाठी काय काय केले पाहिजे, त्यात कोणते विक्षेप येतात, त्यांना दूर करण्यासाठी काय केले पाहिजे. हे सर्व जाणून चित्त एकाग्रतेचा प्रयत्न केला पाहिजे.
4. सत्वपती- दृष्टी बदलणे.
ही सृष्टी प्रभू निर्मित आहे. प्रत्येक वस्तूवर भगवंताचा शिक्का मारून घ्या.
5. असंशक्ती- चित्त एकाग्रता होऊन ती स्थिती अर्धा तास पाऊण तास न तुटता राहिली तर कदाचित असंशक्ती स्थिती होईल. म्हणजे वस्तूचा संबंध तुटून जाईल. मूर्तीचा आकारच जाईल. ह्या स्थितीला पूर्णतेची अनुभूती म्हणतात. त्या ठिकाणी जो राहतो तो फक्त भगवंतच राहतो. मूर्ती आपण होऊनच जाते मन बुद्धी भगवंताला दिले असते. ते शुद्ध होते.
6. पदार्थाभाविनी- या स्थितीत पोहोचलेल्या भक्ताचे जीवन तुष्यंतीच रमन्तीच असते.
7. तुर्यगा

Comments
Post a Comment