राम मंदिर नेमके कसे आहे? संपूर्ण माहिती,
राम मंदिर |
Ayodhya Ram Mandir :
रामलल्लांच्या मूर्तीची कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर २२ जानेवारी २०२४ अयोध्येतल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. देशातीलच नव्हे, तर जगभरातील प्रभू श्रीरामभक्तांना या मंदिराबाबत उत्सुकता आहे. हे मंदिर नेमके कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, सुविधा कोणत्या असतील आदी गोष्टींवर एक नजर....
मंदिरासाठी १८ एकर जागेत बांधकाम होईल, त्यातील ३५ टक्के जागेत बांधकाम असेल. उर्वरित जागेत रस्ते असतील. १० टक्के जागेत भाविकांसाठी विविध सुविधा असतील. मंदिराच्या ६७ एकर जागेत ५ लहान टेकड्या आहेत( अंगद टिला, कुबेर टिला,नल टिला, शेषनाग टिला, पिंडारक) . पाचव्या टेकडीवर मंदिर असेल.
- २३५ फूट मंदिराची रुंदी
- ३६० फूट मंदिराची लांबी
- २.७ एकरवर मुख्य मंदिराचे बांधकाम
- ६७.७ एकर मंदिर उभारणी
- ५७ हजार ४०० चौरस फूट एकूण बांधकाम
- १२ मंदिरासाठी प्रवेशद्वारे
- १८ एकर मंदिर परकोटा (प्रदक्षिणा मार्ग)
- ५ एकूण डोम
- ३ एकूण मजले
- २० फूट प्रत्येक मजल्याची उंची
पहिला मजला : श्रीराम पंचायतन
दुसरा मजला : विविध देवतांच्या मूर्ती
तळमजल्यावरील खांब (कॉलम) - १६०
पहिल्या मजल्या-वरील खांब १३२
दुसऱ्या मजल्या-वरील खांब - ७४
मंदिर परिक्षेत्रात होणार
भाविक - पर्यटक केंद्र

Comments
Post a Comment