भगवंतांनी जिवन जगण्यासाठी दिलेल्या देणग्या
समर्पणात्मक जीवन, समर्पणात्मक कर्म आणि सुंदर जीवन या तीन गोष्टीमुळे आत्मानंद मिळतो.
कृतज्ञता, कृतिशीलता, भावमयता, त्यागमयता आणि समर्पण शक्ती हे पंचामृत मानवात असले पाहिजे.
भगवंताने जसा या गोष्टी टिकवल्या आहेत तशा मलाही टिकवायच्या आहेत.
वैदिक वाङ्मय पूर्ण आहे. त्याच्यामागे एक निश्चित जीवनदृष्टी आहे. एक निश्चित रस्ता आहे. भगवंताचे ऐक्य झाल्यानंतर जी विचारधारा येते तिच्या मागे वासना नसते, भोग नसतो आणि असा जो विचार असतो तो स्वतंत्र शुद्ध विचार असतो त्यालाच आपण वेद म्हणतो. त्याचीच आपण पूजा करतो. त्यालाच आपण अमृतम तू विद्या म्हणतो. ती विद्या व्यक्तीच्या जीवनात आवेश, चैतन्य, भाव उभा करू शकते. मानवाचे वैचारिक मज्जातंतू मजबूत बनवते. तीच मानवाला जीवनदृष्टी देऊन वर घेऊन जाते. तिलाच आपण अमृता विद्या म्हणतो.

Comments
Post a Comment