वसंत पंचमी - महाग शुद्ध पंचमी
![]() |
महाग शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात वसंताचा उत्सव आणि सर्वांचा उत्सव आहे तो ह्या दिवसापासून सुरू होतो सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलाने फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे.
महर्षी वाल्मिकीने रामायणात वसंत ऋतूचे अतिशय सुंदर व मनोहरि चित्रण केले आहे.
भगवान श्रीकृष्णाने गीतेत ऋतू नाम कुसुमाकर असे म्हणून ऋतुराज वसंताचे बिरूदावली गायीली आहे.
कवी कवीश्वर जयदेव तर वसंत ऋतुचे वर्णन करता करता थकलाच नाही. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसंत ऋतू मध्ये लोभस बनतो.
स्वतःच्या कोवळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे. भगवान स्वतःच्या अस्वस्थ मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्त बनवण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात गेले पाहिजे. निसर्गात एक असा आजब जादू आहे . की जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करतो. जर या निसर्गाचे सान्निध्य सातत्य राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो, त्याचा परिणाम ठरतो. निसर्गात आनन्या शून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. त्याच कारणामुळे निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत. असा अनुभव येतो. निसर्ग सुखदुःखांच्या पासून दूर आहे. वसंत असो अथवा वर्षा वेगवेगळ्या रुपात प्रभूचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि समग्र निसर्ग प्रभु स्पर्श प्राप्त करून फुलून उठतो.

Comments
Post a Comment