कर्मयोगीला प्रेरणादायी उत्सव - मकर संक्रात

कर्मयोगीला प्रेरणादायी उत्सव मकर संक्रात 



      मकर संक्रात या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. त्यांच्या पाठीमागे विशिष्ट अर्थ आहे. सामान्य रित्या पतंग उडविण्यासाठी मोकळ्या मैदानात एखाद्या इमारतीच्या छप्परावर किंवा आगाशीवर जावे लागते. आणि थंडीच्या दिवसात सूर्य स्नान घडते अशा दृष्टीने पाहता, आपल्या जीवनाचा पतंग ह्या विश्वामागे असलेली अदृश्य शक्ती एखाद्या अज्ञात आगाशीत उभी राहून उडीत असते. संक्रातीच्या दिवशी असे आकाशात लाल, पिवळे, हिरवे वगैरे रंगाचे पतंग उडताना दिसतात. तसे या विश्वाच्या विषयाला सत्ताधीश, श्रीमंत, विद्वान वगैरे अनेक प्रकारचे पतंग उडत असतात. पतंगाचे अस्तित्व तोपर्यंत राहते की जोपर्यंत त्याची दोरी सूत्रधाराच्या हातात असते. सूत्रधाराच्या हातातून सुटलेला पतंग वृक्षाच्या डाळीवर. विजेच्या तारेवर किंवा संडासाच्या टाकीवर फाटलेले व विकृत दशेत पडलेला पाहायला मिळतो. भगवंताच्या हातातून सुटलेला मानव पतंग हे थोड्याच दिवसात रंग उतरलेला,
 फिका व अस्वस्थ झालेला दिसतो.
       सारांश या पर्वाच्या निमित्ताने सूर्याचा प्रकाश, तिळाचा स्नेह, गुळाचा गोडवा व पतंगाचा त्याच्या सूत्रधारावरचा विश्वास. आपल्या जीवनात साकार झाला तरच आपल्या जीवनात योग्य संक्रमण झाले असे म्हणता येईल.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन