सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव - मकर संक्रात
![]() |
| सांस्कृतिक वारसा जपणारा उत्सव |
या उत्सवा निमित्त स्नेहाकडे जायचं असत. तिळाचे लाडू द्यायचे असते. जुने मतभेद काढून टाकायचे असतात. भांडणे विसरायचे असतात. स्नेहाची पुन्हा प्रतिष्ठापना करायची असते.
महाराष्ट्रात तर हा उत्सव अतिशय प्रचलित आहे. ते एकमेकांना तिळगुळ देतात व देताना म्हणतात तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गुजरातीत आजही ब्राह्मणांना लाडू देण्याची प्रथा आहे. त्याच्या पाठीमागे एक वेगळा भाव लपलेला आहे. आपल्या व त्याचे संबंध दुरावले जातात ते तुटू नयेत म्हणून ब्राह्मणाकडे जाऊन तिळगुळाच्या लाडवा द्वारे आपल्या मनाची शितलता वाढवायची, गोडवा द्यायचा, जुना स्नेह पुन्हा उभा करायचा आणि आपल्या कल्याणासाठी आपल्या जीवनात त्याचे गौरव आणि भरलेले स्थान टिकून ठेवायचे.
तिळाच्या लाडवात पैसा घालून देण्याची प्रथा होती ती गुप्त दानाचा महिमा समजावते. संस्कृती कार्य करणारे ब्राह्मण. ब्राह्मणांची जीवन व्यवस्था समाजाने गुप्त रीतीने चालवली पाहिजे.
तिळांच्या लाडवात असलेले तेल पुष्टीप्रधान आहे. सांस्कृतिक कार्याचा क्रांतिवीर पुष्ट बुद्धीचा असला पाहिजे. प्रभु कार्याचे व्रत हे असीधाराव्रता सारखे कठीण व्रत आहे. त्यात दुर्बळ किंवा लुच्या मनाच्या आणि अस्थिर बुद्धीच्या माणसाचे काम नाही. आज आपण तिळाच्या लाडवा मागील ही भावना विसरून जाऊन केवळ साल्पटाची पूज्या करीत आहोत. पण या उत्सवात तिळाच्या लाडवांना महत्त्व मिळाले त्याचे नैसर्गिक कारणही आहे.
निसर्गातून निसर्ग ऋतु नुसार वनस्पती देतो. ज्या प्रकारचे रोग होण्याची संभावना असते त्या ऋतू त्या रोगांनुसार औषधी वनस्पती फळे वगैरे निसर्ग निर्माण करतो. हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत शरीराचे अवयव आणि अवयव अखडून गेलेला असतो. रक्ताभिसरण बंद होण्याची शक्यता असते. रक्तवाहिन्यावर थंडीचा परिणाम झालेला असतो. आणि शरीर रुक्ष झालेले असते. अशावेळी त्याला स्निग्धतेची गरज असते. आणि तिळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तीळ या ऋतूतील आदर्श खाद्याची गरज पूर्ण करतात. शेतातून ताजे तीळ घरात आलेले असतात. त्यावेळी शुष्क बनणाऱ्या शरीरासाठी याच्यावर अधिक दुसरे योग्य औषध कोणते असू शकते.

Comments
Post a Comment