कर्तृत्व शक्तीला आव्हान - मकर संक्रात

 


 कर्तृत्व शक्तीला आव्हान 


मकर संक्रात कर्तृत्व शक्तीला आव्हान !


        मकर संक्रांत म्हणजे प्रकाशाचा अंधकारावर विजय. मानवाचे जीवनही अंधकार व प्रकाश यांनी वेष्टीलेले आहे. त्याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या व पांढऱ्या तंतुंनी विणलेले आहे. आजच्या दिवशी माणसाने संक्रमण करण्याचा शुभ संकल्प करावयाचा आसतो .

       संक्राती म्हणजे सम्यक क्रांती. क्रांतीमध्ये परिस्थिती परिवर्तनाचे आकांक्षा असते तर संक्रातीमध्ये सम्यक परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते. यासाठी केवळ संदर्भ नाहीत तर मानवी मनाचे संकल्प ही बदलले पाहिजेत. हे विचार क्रांतीने शक्य आहे. 

क्रांतीमध्ये संघर्षाला महत्त्व असू शकते परंतु संक्रातीमध्ये समजूतीचे साम्राज्य पसरलेले असते. संक्रांत म्हणजे संग क्रांती माणसाने या दिवशी संगयुक्त होण्याचा संकल्प करायला पाहिजे. काम, क्रोध, लोभ मोह, मत्सर इत्यादी विकारांच्या परिणामापासून शक्य तेवढे मुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संग मुक्तीतून हळूहळू आपण मुक्त संग बनले पाहिजे. म्हणजे मुक्त जीवनाच्या लोकांचा संघ केला पाहिजे. असे जीवन मुक्त लोकच आपला क्रांतीला योग्य रस्ता, दिशा दाखवू शकतात आणि मार्गदर्शन करू शकतात. संक्राती म्हणजे संघ क्रांती. कोणत्याही महान कार्याला संघटनेची गरज असते. संघशक्ती कलियुगे. संघात विशिष्ट शक्ती निर्माण होते. या विशाल विश्वात कोणतेही काम करण्यासाठी एकटा माणूस अपूर्ण आहे. त्याच्या शक्तीला मर्यादा आहे. संघामध्ये विशिष्ट प्रकारची शक्ती विपुल प्रमाणात एकत्रित होतात व त्या कोणतेही कठीण कार्य सहज शक्य बनवतात. परंतु त्या संगनिष्ठेच्या पायात ज्वलंत प्रभुनिष्ठ असली पाहिजे. ही गोष्ट विसरून चालणार नाही.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन