अध्यात्मिक प्रेमाचे वर्णन



अध्यात्मिक प्रेमाचे वर्णन भगवंतांनी 
 गुणरहितम,कामनारहितम , प्रतिक्षणम, वर्धमानम, अविछिन्नम, अनुभव रूपंम् या रूपात केले आहे.

1.  गुणरहितम - या प्रेमामध्ये सापेक्षाता नाही.
2. कामना रहितम- भगवंता तूला योग्य वाटलं तर कर.
3. प्रतीक्षनम वर्धमानम- भगवंता प्रति प्रेम दिन प्रतिदिन वाढत गेले पाहिजे.
4.  - अविछिन्नम -प्रेमाचा प्रवाह सतत असला पाहिजे. आज अनेक वर्षे झाली स्वाध्याय परिवाराला कुठेही निरस, फिके, प्रेम अनुभवास आले नाही की भक्ती एक समर्थ तत्त्वज्ञान आहे. सामान्यांसाठी  तत्त्वज्ञान आहे . आपण सगळे उपासक आहोत. जेव्हा जेवतो, झोपतो, उठतो तेव्हा भगवंत स्पर्शाची जाणीव होईल तेव्हा ते अध्यात्मिक अविच्छन्न प्रेम होय.
5. सूक्ष्मत्तरम - मी भगवंताचे स्मरण करतो हे कोणाला समजतात कामा नये.
6. अनुभव रूपम् - अध्यात्मिक प्रेमाचा अनुभव घेऊ लागलो तर दोन गोष्टी घडतील. प्रेमाचे गणित बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी रडायचे नाही आणि तक्रार करायची नाही. अशा दोन गोष्टी जीवनात आल्या की तुम्ही भक्तीच्या मार्गावर आहात समजून चला.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन