जीवन कसे असावे?



जीवनात आकाशाची स्वच्छता, 

 नदीची प्रसन्नता,

 सागराची गंभीरता असावी तरच मन प्रसन्न राहते. 

जन्माला येऊन प्रभुकार्यात उपयोगी पडता आले नाही,  जीवन भगवंतमय बनले नाही तर जीवन व्यर्थ जाते. 

दिवाळीला पैशांचा हिशोब करतो तसे वर्धापनदिनीही जीवनाचा हिशोब करावा. जीवनात मिनिटा- मिनिटांचा वेळेचा सदुपयोग जो व्यक्ती चांगल्या कामासाठी म्हणजेच भगवंतासाठी, भगवंत कार्यासाठी वापरत असेल तर तोच महान बनतो.

जो व्यक्ती प्रेमाने हृदयाचा, ज्ञानाने बुद्धीचा शक्तीने शरीराचा विकास साधतो त्याचे जीवन सुंदर व यशस्वी बनते. त्याच्या जीवनात प्रभुचे चरणामृत आहे. त्याचे जीवन प्रभूचा प्रसाद आहे असं म्हटलं जातं. तेच खरे जीवन जगतो मृत जीवनापेक्षा जिवंत मृत्यू चांगला.









Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन