सांस्कृतिक जीवन - काळाची गरज.



सांस्कृतिक जीवन वाढवायचे असेल तर कृतज्ञता व शील निर्माण झाले पाहिजे. ज्याच्या जीवनात कृतज्ञता आली त्याचे जीवन सांस्कृतिक असे म्हणता येते. कृतज्ञतेची सुरुवात भगवंतापासूनच होते. भगवंता प्रती जो कृतज्ञ असतो तो सुशील झाला. सुशिलता नसेल तर बाकीचे गुण असूनही शून्य आहेत. 

पैसा गमावला तर काही गमावले नाही असे म्हणता येईल. 

आरोग्य गमावले तर थोडे गमावले.

शील गमावले तर सर्वच गमावले.

चारित्र्य ज्याने गमावले त्याने सर्वच गमावले. 

जर आपल्यात  कृतज्ञता व शील हे दोन्ही गुण असतील तर आपले जीवन सांस्कृतिक जीवन झाले असे ठरेल. तिसरे अध्यात्मिक जीवन आहे या तिन्ही जीवनाचा दाता व्हाल तर ते भगवंत कार्य आहे. भगवंताचे कार्य हे भगवंताच्या भागाने झाले पाहिजे.

मनुष्यात कृतज्ञता, शील व अध्यात्म या तीन गोष्टींची सांगत असेल तर आपण आपल्या जीवनाचा दाता.

Comments

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन