Posts

Showing posts from December, 2023

शिक्षण

Image
  अव्यक्त गुणांना व्यक्त करणे आणि अव्यक्त शक्तीला जागृत करून कार्याला लावणे त्याचे नाव शिक्षण जीवनामध्ये निश्चित व असंदिग्ध ध्येय प्रदान करते ते खरे शिक्षण. मागील पिढीतील ज्ञानाचा व अनुभवाचा लाभ भावी पिढीला होवा हा शिक्षणाचा हेतू. पैसे मिळवण्यासाठी विद्या मिळवायची नसते.  शिक्षण जीवनाचे दर्शन घडवण्यासाठी, सुख-शांती व समाधान लाभण्यासाठी तसेच ईश्वरा जवळ पोहोचण्यासाठी विद्या मिळवायची असते. प्रत्येक बालकाला जीवनलक्षी शिक्षण मिळाले पाहिजे त्यासाठी प्रत्येक घर, शाळेत मिळालेले संस्कार आत्मसात करण्यासाठी विविध प्रयोगशाळा बनले पाहिजे. शिक्षण जीविकेचे साधन असेल तर ती कला आणि जीवन विकासासाठी असेल तर ती विद्या.

भगवंताची देणगी - जीवन अमृत

Image
  मानवी जीवन सुलभ होण्यासाठी भगवंताने जीवनामध्ये खूप गोष्टी भरल्या आहेत . 1. साफल्य - उत्साह वाढवते. 2. वैफल्य- दृढता वाढवते . 3. पौरुष - उपभोग क्षमता व उपभोग तीव्रता यासाठी पौरुष व सामर्थ्य . 4. कर्ममयता - गतिशीलता , धर्म . 5. वेग - 1.गती 2.सामर्थ्य 3.स्थान . 6. आवेश - उत्कट मनोविकार . 7. सुंदरता - सुंदरता, वंदनीय ,पूजनीय बनावे लागेल.  8. कुरूपता - सौंदर्यसापेक्ष आहे . 9. ग्लानी - थकवा . 10. उदारता - माणसाचा स्वकर्तृत्वावर विश्वास पाहिजे . 11. कार्पण्य -  मानोदार्यबल्य. जीवनात सनाथत्व व अनाथत्व स्वीकारले पाहिजे. 12. कारुण्य - दया जेव्हा चालू लागते तेव्हा तिला कारुण्य म्हणतात . 13. द्वेष - द्वेषाची तीव्रतर भावना अपेक्षित आहे . 14. उपरोध - प्रतिबंध . प्रवाह विरुद्ध पोहायचे आहे.  15. रोदन - रुदन, रडणे.  16. मुडता - कर्माप्रमाणे भक्तीतही वेडे झाले पाहिजे.  17. कामुकता - कामुकतेत उत्साह आहे, आकर्षण आहे, आक्रमण आहे, आवेश आहे आणि सौंदर्य पिपासा आहे त्यात आगतिकता आहे, ग्राहकता आहे, शरणागती आहे व वर्तन चातुर्य ही आहे. हे सर्व तिचे परिणाम आहे  18. तत्त्वज्ञान -...

नर कोणाला म्हणायचे ?

Image
नर कोणाला म्हणायचं ? जो आत्मप्रत्यायवान, महत्वकांशी, कृतज्ञ आणि परोपकारी आहे तोच नर आहे. मनुष्यत्वामध्ये आत्मप्रतिकार, आत्मविश्वास, आत्म गौरव तिन्ही गोष्टींचे रसायन तयार होते तेव्हा आत्माप्रत्येवान म्हणतात. मी सुखी बनेल,  मी प्रभूचा बनेल अशी महत्वकांक्षा असली पाहिजे. माणूस कृतज्ञ असला पाहिजे.  प्रभुचे जे काही काम अपेक्षा रहितपणे करण्यात येईल तो परोपकार आहे.

वाक् ब्रम्ह

Image
संसारातील विविध तापांच्या भीतीने अनेकजण संसार निवृत्त होता परंतु श्रेष्ठ ते होते की जे प्राणी मात्रांच्या प्राणाला पवित्र आणि पूज्य मानतात आणि त्याच्या विकासार्थ संसारात राहतात. जीवन, पळून जाण्यासाठी किंवा भिण्यासाठी नाही तर पूजन करण्यासाठी आहे.