Devān Ghevān | देवान घेवान



      
संत मोठे की भगवंत मोठा हा प्रश्न उठताच आधी असंच वाटतं की भगवंत मोठा, पण खरं तर संत त्याच्याहूनही मोठे आहेत. आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगा बद्दल मी काही निराळ बोलण्याची गरज नाही. पण तुम्ही पंढरपूरला जा आणि पहा.
 
पंढरीनाथाच्या मंदिराच्या प्रांगणात बसलेले जे लोक असतात ते कोणाचं संकीर्तन करीत असतात? कोणाचं नामस्मरण करीत असतात? ते तासं तास ज्ञानोबा माऊली तुकाराम असाच घोष करीत बसलेले तुम्हाला दिसतील. याचं कारण ज्ञानेश्वर, तुकाराम या लोकांनी भगवंताला भाव वैभव दिलय. नाहीतर लक्ष्मी पाय चुरायला लागल्यावर भगवंताचा भाव नाहीसाच झाला होता. अशा संत मंडळींनी देवाला जो भाव दिला आहे त्या भावामुळेच आपल्या सारख्या शंकररावाच रक्षण, पालन व पोषण होत आहे. म्हणून तर म्हटलं आहे की ददाती प्रतिगृह्णाति.
     
आपला संतासोबत आत्मिक संबंध आहे. पण संत थेट नाही देत. कारण की संतांना असं वाटतं की, 'आम्हीच थेट द्यायला लागलो तर लोक आम्हाला मोठे मानायला लागतील आणि मग ते आमच्यापासून दूर होत जातील.' आणि संतांना लोकांपासून दूर जायचं नाहीये. म्हणून मग ते अशा प्रकारे गुप्तपणे देतात, भगवंताच्या मार्फत देतात.
     
मूळ मुद्दा असा आहे की, भक्त आणि भगवंत हे दोघेही एकत्र बसलेले आहेत. बाकी कोणीच तिथे नाही. भक्त सुद्धा महान आणि भगवंत सुद्धा महान आहे. कारण भगवंताने गीते मध्ये सांगून ठेवला आहे की, ये यथा मां प्रपद्यन्ते तां स्तथैव भजाम्यहम्|  भगवंत सांगतो, 'तू जितका आहेस तितकाच मीही आहे.' हे दोघेच जण बसले आहेत तेव्हा विश्वामधलं दुसरं कोणीही तिथे नाही. इतर माणसांचे श्वासोच्छ्वास सुद्धा नाहीत. त्यावेळी भगवंत आणि भक्तात हा व्यवहार होतो की ददाती प्रतिगृह्णाति  - 

भगवंत भक्ताला भोगवैभव देतो आणि त्याच्याकडून भाव वैभव घेतो. जसा भगवंत देतो आहे तसा घेतो पण आहे. तसाच जीव सुद्धा भगवंताला देतो आणि घेतो.
    
जीव भगवंताला काय देतो? जीव आपला अहम् देतो. इतकच नाही तर अहम् पुन्हा घेतोही. कारण की स्वतःचा अहंकार दिला तर तो व्यवहारात उभाच राहू शकणार नाही. अहम् निघून गेला तर त्याची स्मूर्ती जाईल आणि त्याचं ज्ञान ही जाईल. त्याचा आवाज जीवानव्यवहार ठप्प होईल. म्हणून तल्लीन अवस्थेमध्ये भगवंताला अहम् दिल्यानंतर तो दिलेला अहम् भक्ताला पुन्हा परत घ्यावा लागतो. एकदा दिलेलं परत मागून घेऊ नये अशी जी मान्यता आहे ती लोक व्यवहारात आहे. परंतु आत्मीय जनांमध्ये अशा लोक व्यवहारांना स्थान नाही. म्हणून मग जीव भगवंताला सांगतो, 'देवा! मी तुला माझा अहम् देऊन टाकला आहे. पण आता मी जेव्हा विश्वात परत जाईन तेव्हा दुसऱ्या कोणालाच मी ओळखू शकणार नाही. कारण की अहम् च्या सोबतच बुद्धी चिकटून बसलेली असते आणि तोच माझा अहम् आता माझ्यापाशी नाही. त्यामुळे बुद्धीच कामकाज बंद झाल आहे. तेव्हा मला माझा अहम् परत दे.' अशाप्रकारे भगवंताला अहम् द्यायचा आणि प्रसाद रूपाने त्याच्याकडून परत मागून घ्यायचा यालाच म्हणतात  प्रतिगृह्णाति.

संत आणि भगवंत यांच्यातील हा परस्पर व्यवहार – "ददाती प्रतिगृह्णाति" – याचा असा अन्वय लावणे हा खूप गहन दृष्टिकोन आहे.

संतांनी भगवंताला दिलेल्या "भाववैभवा"मुळेच तो आमच्यासाठी सजीव वाटतो, अन्यथा तो निर्जीव, निर्गुण राहिला असता. तसेच, भक्ताचा आणि भगवंताचा संवाद हा केवळ दान - प्रतिदानाचा नाही, तर तो एक आत्मसंवाद आहे. आपण अहंकार अर्पण करतो, परंतु पुन्हा तोच परत घेतो—कारण व्यवहारासाठी तो आवश्यक आहे. पण हाच अहंकार संतांच्या सान्निध्यात, भगवंताच्या कृपेने, परिष्कृत होतो. त्यामुळे तो आता जड नाही तर सहज होतो.

 "ये यथा मां प्रपद्यन्ते" गीतेमध्ये हा विचार स्पष्ट आहे की भगवंत प्रत्येकाला त्याच्या भक्तीच्या स्वरूपानुसार प्रत्युत्तर देतो. त्यामुळेच भगवंत आणि भक्त यांचा संबंध हा दोघांनाही उन्नत करणारा आहे—संतांच्या मार्गदर्शनामुळे भक्ताला भगवंत भेटतो आणि भक्ताच्या भावाने भगवंताचा "भाव" वाढतो.

हा विषय आणखी खोलात जाऊन पाहता, संत हे भगवंताच्या दारी उभे असलेले मार्गदर्शक आहेत, जे स्वतःचा मोठेपणा भक्तावर लादत नाहीत. त्यामुळेच त्यांचे देणेही गुप्त राहते. हीच खरी अध्यात्मिक विनम्रता आहे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

यशस्वी जीवन जगायला शिकवणारी विद्या | The knowledge that teaches how to live a successful life.

गीता जयंती — जीवनाला नवं प्रकाश देणारा दिवस

मनुष्य गौरव दिन