स्वाध्याय कुठे आणि कसा करावा ?
स्वाध्याय
वाचलेलं, ऐकलेलं पुन्हा पुन्हा वाचणे किंवा ऐकणे त्याचे नाव अभ्यास. स्वाध्यायात अभ्यास अपेक्षित आहे. श्रोता अवेग्रत असायला हवा. ऐकताना त्याच्या डोक्यात दुसरा कुठलाही विचार असता कामा नये. असा श्रोता पुण्यशाली.
स्वाध्यायाची जागा कशी असली पाहिजे? वाटेल त्या ठिकाणी स्वाध्याय होत नाही. म्हणजे जेठा मार्केटचा चौकात स्वाध्याय नाही होणार. स्वाध्यायाची जागा अशी पवित्र असली पाहिजे. गावात सेठजी एक हॉल बांधतात. तिथे सकाळी लग्न लागते, दुपारी शोक सभा होते आणि संध्याकाळी स्वाध्याय असं नाही. भगवंताला पक्के माहिती असायला पाहिजे की मला कुठे उभे राहायचे आहे.खऱ्या अर्थाने स्वाध्याय चालत असेल तिथे भगवान येतो. त्याला खात्री वाटली पाहिजे की या जागी गेलो तर गीता किंवा उपनिषदांच्या विचाराशिवाय दुसरे काही ऐकायला मिळणार नाही. काही लोक म्हणतात की हा हॉल रिकामा असेल तर दुसऱ्या कार्यासाठी का वापरू नये? नाही वापरता येणार. रेसचा घोडा रिकामा उभा असेल तर म्हणून वरातीसाठी वापरला जातो का? नाही. रिकामा उभा आहे तर वरातीसाठी द्या, पैसे मिळतील, अशी कमाई नको. रेसचा घोडा रेस मध्येच चालतो. स्वाध्यायाची जागा निश्चित असली पाहिजे. येण्याची ती निश्चित जागा असेल त्या जागेचा परमाणु आणि परमाणु पवित्र असला पाहिजे. अशी जागा म्हणजे जुन्या काळची मंदिर होती. त्या पवित्र जागेत दुसरे कोणतेही कार्यक्रम होत नसत . दुर्जन लोक जिथे एकत्र होत असतील, शूद्र लोक ज्या स्थळी श्वासास्वास करत असतील, ज्या ठिकाणी कुत्री, गाढवे फिरत असतील, जिथे जुगारी जुगार खेळत असतील. त्या जागी स्वाध्याय होत नाही. ज्या ठिकाणाचे जळ आणि वायू पवित्र असतो त्या ठिकाणी स्वाध्याय होतो. अशा ठिकाणी स्वाध्याय झाला तर तो मानवात कृतज्ञता आणतो.
Comments
Post a Comment