स्वाध्याय करून घेणारा ब्राह्मण कसा असावा?
स्वाध्यायाचा ज्ञानयज्ञ
स्वाध्याय कोण करून घेतो?
स्वाध्याय करून घेणारा ब्राह्मण कसा असावा?
त्याचे हे वर्णन आहे. स्वाध्यायाचा ज्ञानयज्ञ काही लोक करतात. स्वाध्याय शब्द वापरायला तो योग्य आहे पण भगवंताने त्यात ज्ञानयज्ञासारखा शब्द ही वापरला आहे. म्हणजे स्वाध्याययज्ञ आणि ज्ञानयज्ञ नाही तर स्वाध्याय आणि ज्ञान हे दोन शब्द लिहिण्याचे कारण नाही. ज्ञानाकडे घेऊन जाणारा तो स्वाध्याय हा अर्थ होऊ शकतो. ज्ञान निराळे आणि अज्ञान निराळे. काही लोक ज्ञानाच्या मागे लागतात तर काही जण अज्ञानाच्या मागे लागतात. आपल्याला असे वाटते की आपण सगळे ज्ञानाच्या मागे लागलो आहोत. प्रत्येक माणूस समजतो की तो ज्ञानाच्या मागे लागलाय.
केटरिंग कॉलेजला जाणारा माणूस ज्ञानाच्या मागे लागला आहे की अज्ञानाच्या मागे. समोसा कसा तयार करायचा हे समजावते ते ज्ञानच आहे की नाही. ते आठवी कॉलेजचे पण स्कॉलर्स असतात. कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी सुद्धा ज्ञान आहे की नाही ? तर ते ज्ञान आहे. असे लोक म्हणतात. परंतु गीता जे सांगते आहे ते सर्व ज्ञान आहे. गीतेचा तेरावा अध्याय तुम्ही वाचाल तर त्यात ज्ञानाचे खूप विस्ताराने वर्णन केले आहे. गीतेच्या तेराव्या अद्यायात भगवान म्हणतो की, तुला मिळालेले शरीर माझे आहे. ते क्षेत्र आहे. मी स्वतः क्षेत्रज्ञ आहे. म्हणून क्षेत्रात काय पेरायचे ते पण समजावले आहे. या प्रमाणे सर्व सांगता सांगता शेवटी म्हटले आहे अध्यात्म ज्ञान नित्यत्वम् तत्वज्ञानार्थ दर्शनम्|
अध्यात्मज्ञान म्हणजे तत्त्वज्ञानार्थ दर्शनम् सत्य सिद्धांत म्हणजे तत्व हे जे दाखवते, समजावते त्याचे नाव ज्ञान. बाकी सारे अज्ञान. असे स्पष्ट भगवान सांगत आहे. उद्या जर मी भागवत कथा सांगून माझे पोट भरू लागलो तर ते अज्ञानच ठरेल असे गीता म्हणते.
Comments
Post a Comment