Posts

Showing posts from April, 2025

अक्षय तृतीया

Image
आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!ही पावन तिथी आपल्यासाठी सुख, समृद्धी आणि अध्यात्मिक प्रगती घेऊन येवो, अशी मंगलकामना!

गुरुचे अलंकार

              आपल्या देशात असे तेजस्वी आणि चैतन्यमय गुरु पुष्कळ झाले आहेत. सगळे ऋषी आपले गुरुच आहेत. अन्य गुरू आपल्याला हवेतच कशाला? परंतु या ऋषींना प्रमाण मानायला आम्ही कुठे तयार आहोत? ज्यांच्या बद्दल काहीही शंका घेण्याचं कारण नाही असे प्रचंड आणि महान ऋषी आपल्या देशात होऊन गेले आहेत आणि तेच आपले गुरु आहेत.     वर म्हणजे आध्यात्मिक दृष्टीने श्रेष्ठ पुरुष. त्याच्याजवळ काही अलंकार असले पाहिजेत. अलंकाराशिवाय गुरु होता येणार नाही. असे कोण कोणते अलंकार गुरुपाशी असलेच पाहिजेत?  १. भगवंत स्पर्शी जीवन,  २. ज्ञानपूर्ण मस्तक,  ३. भावपूर्ण काळीज,  ४. वृत्तीची महानता,  ५. अंतकरणाची उदारता,  ६. जीवनाची तेजस्विता आणि  ७. हृदयाचा वैभव.  हे सात अलंकार ज्याच्या जीवनात असतील तो वर गणला जातो. श्रेष्ठ गणला जातो. अशा या सातही गोष्टी ज्याच्या जीवनात असतील त्याला वर समजा. मात्र यदाकदाचित आपल्याला असा वर मिळाला तरी आपण त्याला अवर समजून बसतो. श्रेष्ठ पुरुषाला समजण्यासाठी सुद्धा तेवढी लायकी असावी लागते. न रत्नमन्विष्यति मृग्यते ...